विविध सामाजिक उपक्रम राबवून रविकुमार सोनवणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…!
बीड (प्रतिनिधी) शहरातील सुप्रसिद्ध व्यक्ती, लेखक, कवी, नाटककार, स्पष्टवक्ता, वैचारिक, अभ्यासू व्यक्तिमत्व आयु. रविकुमार सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७जुलै २०२५ रोजी शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते.
बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मा.बाबुरावजी पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सकाळी १०:०० वाजता भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीम नगर येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय माजलगाव येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.मूकबधिर निवासी शाळा माजलगाव येथे विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.तसेच यशोधरा बुद्ध विहार फुलेनगर माजलगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
प्रत्येक जण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना आपण पाहतो मात्र रविकुमार सोनवणे यांचा वाढदिवस हा सर्वांना आनंद देणारा ठरला.समाजाच आपण काही देणं लागतो या भावनेतून रविकुमार सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले.
.यावेळी मा.श्रीहरी नाना मोरे (उपसभापती,कृ.उ.बा.स.माजलगाव)मा.कचरूजी तात्या खळगे (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)मा.नवनाथ अण्णा धाईजे (ज्येष्ठ नेते,बहुजन विकास मोर्चा), मा.राजेश भाऊ साळवे (मा. बांधकाम सभापती,न.प.),मा.भीमराव आप्पा टाकणखार (ज्येष्ठ नेते, बहुजन विकास मोर्चा)मा.सचिन आबा डोंगरे (उद्योजक तथा मा. नगरसेवक),प्रदीप जिजा पटेकर,शेख बाबा,शेख फेरोज अभिजीत भैय्या पोटभरे, प्रा.लक्ष्मण मस्के, सुशीलाबाई चंद्रमोरे, कमलबाई डोंगरे, सीताबाई खळगे, मनोरमा सोनवणे, केसरबाई राऊत, रंगुबाई पाईक, वेणूबाई माने, सुनंदा घाडगे, शिवशीला निसर्गंध, भिमराव सोनवणे, बाबासाहेब जाधव सर, राजकुमार सोनवणे सर, प्रा.सुदर्शन स्वामी, ॲड.रवी उघडे, अशोक लांडगे सर, अक्षय भैया मोरे, सुशील पोळ, सदानंद भैया प्रधान, किरण खळगे, दिपक टाकणखार, प्रा.नितीन फंदे, राजरत्न खळगे, बापूसाहेब येटाळे, रियाझ काझी, निलेश कांबळे, आकाश सावंत, धम्मपाल जावळे, राहुल मस्के, फारुकअण्णा सय्यद, विलेश कांबळे, दिपक शिंदे, सचिन टाकणखार, सचिन वैद्य, मंगेश पोळ, अमोल गायकवाड, आकाश टाकणखार, सुधाकर वाघमारे, प्रफुल्ल जावळे, शुभम प्रधान, ॲड.चेतन सातपुते, आदेश धाईजे, संकेत खळगे, किरण जावळे, युवराज नरवडे, विश्वजीत अलकुंटे, सतीश जाधव, ऋषिकेश पट्टेकर, शिशिर प्रधान, अशोक मेंडके, दिलीप कुलतरखे, विकास मस्के आदी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी किशोर सातपुते, संघानंद साळवे, राज सोनवणे, अजिंक्य वाघमारे, नंदकिशोर निसर्गंध, सारंग स्वामी, नागेश जावळे, सचिन पट्टेकर, संदेश निसर्गध, अजय सुरवसे, संजोग कसबे, सिद्धार्थ निसर्गध, आशिष धाईजे, सुबोध खळगे, ऋषिकेश सोनवणे, विशाल सोनपसारे, सुजल खळगे, विकास सावंत आदींनी परिश्रम घेतले.