तरुण तडफदार जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांच्या जनता दरबारात वेगवान कामगिरी,
534 प्राप्त अर्जावर 280 प्रकरणे निकाली,सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान.
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत आठवड्याच्या प्रत्येक सोमवार मंगळवार व गुरुवार या दिवशी दुपारी बारा ते दोन या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. सदरील अर्जावर योग्य ती कारवाई करण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी पृष्ठांकन करत असतात जनता दरबारात आतापर्यंत एकूण 534 अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी 280 अर्जावर तातडीने कार्यवाही करून सदरील अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत.व उर्वरित 234 प्रकरणात कार्यवाही करण्यात येत असून जिल्हाधिकारी यांना प्राप्त होणारे अर्ज तक्रारीचे लवकरात लवकर निकाली काढण्याचे सर्व संकलनांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच सर्व संबंधित संकलनांना या संदर्भात गुगल शीट देण्यात आली असून प्राप्त प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार मध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी या प्रामुख्याने तालुकास्तरावरील असून उपविभाग व तालुकास्तरावर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणे प्रमाणात गर्दी होत आहे. यातील बऱ्याच समस्या या स्थानिक पातळीवर सुटण्यासारखे असल्यामुळे दिनांक 28 मे 2025 पासून उपविभाग व तालुकास्तरावर देखील प्रत्येक सोमवार व गुरुवार या दोन दिवशी दुपारी 12 ते 2 या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलेले आहे व त्यानुसार
उपविभागीय स्तरावर व तालुका स्तरावर देखील जनता दरबार भरणार: जिल्हाधिकारी मा.विवेक जॉन्सन
नागरिकांनी त्यांचे तक्रारी अर्ज तालुका स्तरावरील जनता दरबारात सादर कराव्यात असे याद्वारे आव्हान करण्यात येत आहे .याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरील जिल्हाधिकारी यांच्या उत्तम नियोजनामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याची आशा पल्लवित होत असल्याने सर्वमानाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.