एकनाथांचे एकमेव खंदे शिलेदार,
मा.ना.संजयजी शिरसाट (मंत्री) महाराष्ट्रातील एकमेव भव्य नागरी सत्काराने भारावले ………
सामाजिक न्यायासाठी एक पाऊल पुढे…
माजलगाव ( प्रतिनिधी) बहुजन समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार व पेढे तुळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्र राज्यच्या सामाजिक न्याय मंत्री व शिवसेना बीड संपर्क मंत्री पदी निवड झाली,ही जबाबदारी मला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचे खंदे शिलेदार म्हणून लाभली असून, ती बहुजन समाजासाठी एक आशेचा किरण आहे. असे उदगार मा. ना. संजयजी शिरसाट यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,
माजलगाव शहर व मतदारसंघात सध्या अनेक ठिकाणी बौद्ध विहारांचे काम सुरू आहे. या कामांना अधिक गती देऊन, सामाजिक समरसतेसाठी व माता-भगिनींसाठी सार्वजनिक उपयुक्त ठिकाण उपलब्ध करण्याचा संकल्प आहे. अशी मनातील इच्छा व्यक्त केली.
औद्योगिक दृष्टिकोनातून माजलगाव परिसरात विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीत मोठा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करू. त्याच बरोबर
या गौरवाच्या प्रसंगी बहुजन समाजातील महिला, पुरुष, तरुण हे दुपारी 3 वाजल्या पासून मंडप मध्ये बसून वाट पाहत होते.हे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवले असेच प्रेम आयुष्य भर आमच्यावर राहू देत ही अपेक्षा व्यक्त करतो,
आणि तुमचा उत्साह, प्रेम पाहून मी खरोखरच भारावून गेलो असे उदगार मा ना.संजयजी शिरसाट यांनी काढले
.यावेळी. माजलगाव चे आमदार श्री. प्रकाश सोळंके व गेवराई चे आमदार श्री.विजयसिंह पंडित व बहुजन विकास मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, उपसभापती श्री. हरि नाना मोरे, मा. नगरसेवक सचिन आबा डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या भव्य सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असे बोलून भविष्यात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध राहील असे आश्वासन सामाजिक न्याय तथा पालकमंत्री छत्रपती संभाजी नगर चे मा. ना. संजयजी शिरसाट यांनी दिले.