एम टी एस परीक्षेत कु.एशना विकास वाव्हळकर हिने गोल्ड मेडल पटकावले. सर्व स्तरातून कौतुकाचां वर्षाव
माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील वरद राजस्थानी प्राथमिक विद्यालय मध्ये इयता तिसरी वर्गात शिक्षण घेत असलेली कु.एशना विकास वाव्हळकर ही एम टी एस परीक्षेत 300 पैकी 188 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.सदरील परीक्षा महाराष्ट्र शासनमान्य परीक्षा असून ती परीक्षा राज्यस्तरीय स्तरावर आयोजित केली जाते.विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला चालना देण्यासाठी असा परीक्षेचे आयोजन केले जाते. सदरील मुलगी ही पहील्या वर्गा पासुन अतिशय हुशार, आहे . तिने हुशारीची चुणूक दाखवुन शाळेचे नाव आणि कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. वरद राजस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे घवघवीत यश संपादन केले आहे सर्व स्तरातून शाळेचे तसेच कु.एशनाचे आई वडील यांच्या सह सर्वस्तरातून कौतुक होत असुन सुभेच्छाचां वर्षाव होत आहे.