श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम,
विश्वरत्न सुभाष बोराडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.
माजलगाव(प्रतिनिधी) नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ९७.०२% लागला असून १००% गुण घेऊन ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन ८९ विद्यार्थी, त्यात विश्वरत्न सुभाष बोराडे या विद्यार्थ्यांनी 78.20 % एवढे गुण प्राप्त केले.असुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.त्याचे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असुन विविध ठिकाणी सत्कार केले जात आहेत.विशेष प्राविण्य १४५ विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. प्रथम श्रेणीत 77.द्वितीय श्रेणीत ६१ तर तृतीय श्रेणीत १४ विद्यार्थी गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक प्रकाश दुगड, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अमरनाथ खुर्पे, श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, कार्यवाह अॕड विश्वास जोशी, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत भानप, शाळेचे मुख्याध्यापक संतोष लिंबकर सर, उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे सर, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, कमलाकर झोडगे, परमेश्वर आदमाने, दहावी प्रमुख नरेंद्र कोष्टगावकर, कार्यालय प्रमुख संतोष लवडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.