माध्यमिक विद्यालय सावरगाव शाळेतून कु.त्रिशाला कुव्हारे प्रथम
माजलगाव (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्डच्या परीक्षेत माध्यमिक विद्यालय सावरगाव, ता.माजलगाव येथील त्रिशाला कमलाकर कुव्हारे हिने 89.40% प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल बौद्ध संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.धम्मानंद बोराडे, प्रकाश नगरी वृत्तपत्र संपादक तथा दैनिक सम्राट प्रतिनिधी सुहास बोराडे, साई ग्राफिक्स समूहाचे अशोक कांबळे, प्रल्हाद बोराडे सर, एपीआय मुंजाबा कुव्हारे, कैलास कुव्हारे राहुल कुव्हारे, बबलू फंदे, सुशीम बोराडे, सुधीर कुव्हारे ,प्रवीण कुव्हारे व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.