कोष्टी समाजाने जोपासली सामाजिक बांधिलकी.
नितीन जुजगर यांच्या हस्ते माजलगाव बसस्थानकात पाणपोईचे उद्घाटन;
प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय.
माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव शहरात कोष्टी समाजाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आज शुक्रवार, दिनांक 9 मे रोजी महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून माजलगाव बसस्थानकात प्रवाशांसाठी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.
या पाणपोईचे उद्घाटन कोष्टी समाजातील तरुण आणि उत्साही कार्यकर्ते नितीन जुजगर यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे बसस्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना कडक उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोष्टी समाज माजलगावने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून केलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिक व प्रवासी यांनी स्वागत केले. उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर नागरिक, समाजबांधव तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक कार्याच्या दिशेने कोष्टी समाजाने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.