सावरगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा जयंती साजरी करणारे मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते स्व: दामोधर जगताप.
वडिलांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवणारे राजेंद्र जगताप यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 134 व्या जयंती निमित्त समाज बांधवांकडून मानवंदना.
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावरगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा जयंती साजरी करण्याची सुरुवात मराठा समाजातील स्व: दामोधर जगताप यांनी केली.त्यांच्या कार्याला साथ,गावचे पोलिस पाटील स्व:अर्जुनराव जगताप यांनी दिली.या दोन्ही जगताप कुटुंबात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात जयंती साजरी केली जाते.
या मंडळीच्या कार्याचा वसा मुलगा राजेंद्र जगताप आणि पोलिस पाटील यांचे चिरंजीव अभिमन्यु जगताप यांनी पुढे सुरू ठेवला आहे. आज दिनांक 27 रविवार रोजी सावरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. या प्रसंगी दोन्ही जगताप कुटुंबातील चिरंजीव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
1972 साली संपूर्ण देश दुष्काळात होरपळत होता. लोकांच्या खाण्या पिण्याची तारांबळ उडत होती. खायला अन्न, पिण्यास पाणी मिळे कठीण होते. अशा परिस्थिती सामाजिक कार्यकर्ते स्व: दामोधर जगताप यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा जयंती गावात साजरी केली. आणि आयुष्य भर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आणि जीवन जगण्याचा ग्रंथ म्हणून संविधान डोळ्या समोर ठेवून जीवन व्यतीत केले
जाती वादाच्या कार्यकाळात देखील स्व: दामोधर जगताप हे कधी डगमगले नाहीत, समाजातील लोक काय म्हणतील याकडे लक्ष दिले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालत राहिले. जे योग्य कार्य आहे ते करत राहिले. म्हणून आज सुजलाम् सुफलाम् कुटुंब झालेचे त्यांच्या कडून बोलले जायचे. जयंतीच्या प्रसंगी स्व: दामोधर जगताप यांच्या कार्याचा सुगंध आल्या शिवाय राहत नाही.
सकाळच्या सत्रात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण स्व: दामोधर जगताप यांचे चिरंजीव मा. राजेंद्र जगताप ( सर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परमेश्वर नाईकनवरे, अशोक नाईकनवरे, अजिंक्य जगताप, अशोक कांबळे, भीमराव कुव्हारे, प्रा. धम्मानंद बोराडे, अमोल फंदे, प्रल्हाद बोराडे, बाबासाहेब बोराडे, सुहास बोराडे, इत्यादीच्या उपस्थितीत मान्यवरानी बुद्ध वंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होऊन मानवंदना दिली.