14 C
New York
Tuesday, April 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

जीवनातील लहान-लहान सवयी, मोठा बदल..!

उद्योजक, विद्यार्थी, आणि प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात यशस्वी ध्येय साधण्यासाठी एक मूलमंत्र…!

सक्षम निती भाग-1 (अशोक कांबळे )

लहान लहान सवयी, मोठा बदल..!

तुमच्या जीवनात कोणताही योग्य बदल घडवायचा असल्यास तुम्हाला सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जसे की, एखाद्या कडक दगडावर पाण्याचा थेंब थेंब पडत राहिल्यास, तो दगड एक दिवस फुटतो आणि त्याची आकार रेषा बदलते. तथापि, जर तुम्ही एका रात्रीत पाण्याचा टँकर त्याच्यावर ओतला तरी तो दगड फुटणार नाही! त्यामुळे, सातत्याने थेंब थेंब पडत राहिल्यास जो बदल होत आहे तो नैसर्गिक असतो आणि तो कायम टिकतो. एका रात्रीत किंवा एकदम प्रयत्न करून होणारा बदल टिकाऊ नसतो!

जर तुम्हाला तुमच्या जीवनात, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किंवा आरोग्याशी संबंधित बदल घडवायचे असतील, तर तुम्हाला थेंब थेंबाप्रमाणे प्रयत्न करणे सुरू ठेवले पाहिजे! तुमच्या सवयींमध्ये बदल आणणे खूप महत्वाचे आहे, कारण एका रात्रीत तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी ते स्वप्न पूर्ण होणार नाही! तुमचे आजचे लहान लहान पाऊले उद्याच्या मोठ्या यशाचे कारण बनू शकतात! तसेच, कोणताही पदार्थ किंवा वस्तू तिच्या मूळ स्वरूपामध्ये अणू म्हणून असते. म्हणजेच, अणू हा पहिला आणि मूलभूत घटक असतो.

तसेच, याच्या उलट, आजच्या तुमच्या लहान लहान चुकीच्या सवयी मोठ्या मोठ्या चुकीच्या सवयींत बदलून मोठ्या अपयशाचे कारण बनू शकतात!

म्हणजेच, कोणताही चांगला किंवा वाईट बदल हा चुकीच्या किंवा चांगल्या सवयीमुळेच होत असतो. त्यामुळे चांगल्या सवयी लावणे खूप गरजेचे आहे!

प्रत्येकांचे उद्दिष्ट पूर्ण का होत नाहीत:

उद्दिष्टे सर्वांची चांगली असतात, पण तीच उद्दिष्टे पूर्ण होतात, जे सातत्याने लहान लहान प्रयत्न करत राहतात आणि त्यांच्या प्रत्येक पावला यशाकडे उचलत राहतात, त्यांचेच उद्दिष्टे पूर्ण होतात!

MPSC/UPSC/स्पर्धा परीक्षेची लाखो विद्यार्थी तयारी करत असतात, पण फक्त काहीच विद्यार्थी यशस्वी का होत असतात? कारण त्यांनी सतत केलेले प्रयत्न, आजवर घेतलेल्या प्रत्येक अपयशाची एक एक कारणे त्यांच्या विचारात बदल घडवून आणत असतात. त्यामुळे कोणतेही अपयश हे अपयश नसते, तर ते एक यशस्वी पाऊल असते. त्यामुळे प्रत्येक प्रयत्न करणे हे खरे यशाचे मूलभूत गाभा (अणू) आहे!

जगातील मोठ्या वस्तू आणि लहान वस्तूही प्रत्येक अणूपासूनच बनलेली असते. याचा अर्थ असा की तुमचा पहिला प्रयत्न हा सुनिश्चित असावा, आणि तो योग्य दिशेने असावा! लहान लहान अणूपासून मोठ्या वस्तू तयार होत आहेत!

तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट किंवा मिशन हे तुम्हाला यशस्वी बनवत नाही, तर त्यासाठी तुम्ही घेतलेले उद्दिष्टाच्या पाठलाग कशा पद्धतीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि सततच्या प्रयत्नांनी तुम्हाला यशस्वी बनवतात. केवळ उद्दिष्ट घेऊन चालत नाही, तर त्यासाठी सतत प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे!

उद्दिष्ट पूर्ण करण्याचे महत्त्वाचे सूत्र असे आहे:
Mission + Action + Action = Habit = Success

याचा अर्थ असा होतो की तुमची उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि त्या उद्देशासाठी तुम्ही जर सातत्याने प्रयत्न करत राहिला, तर त्या प्रयत्नांची तुम्हाला सवय लागेल आणि सवयीचे रूपांतर हे निश्चितपणे यशामध्ये होईल!

ब्रेन:

ब्रेन (मेंदू) ही अशी गोष्ट आहे की, तुम्ही त्याला जे आदेश द्याल, तो तुमचा आदेश पूर्ण करण्याचे काम करतो. मग तो चांगला असो किंवा वाईट, मेंदूला कोणतेही चुकीचे किंवा चांगले, वाईट कळत नाही. तो फक्त आदेश पाळतो!

तुमची बॉडी ही मेंदूची गुलाम असते! जो आदेश येईल, तो तुमची बॉडी पूर्ण करेल!

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमचा मेंदू हा सवयींचा गुलाम असतो!

आता आपण सवयीचे उदाहरण पाहू की, जसा आपण संध्याकाळी झोपतो आणि सकाळी उठतो, सकाळी उठल्याबरोबर ब्रश करतो, आंघोळ करतो, दैनंदिन क्रिया करतो; ह्या क्रिया तुम्हाला सवय झालेल्या आहेत. या सवयी कशा झाल्या? तर त्या आपल्या मेंदूकडे पाठ झाल्या आणि मेंदूची सवय तुमच्या बॉडीला सवय लागली आणि या सवयीचे रूपांतर ह्या दैनंदिन क्रियांमध्ये झाले आहे! याला कोणताही अतिरिक्त प्रयत्न लागलेला नसतो!

हे सर्व सांगण्याचे उद्दिष्ट हाच आहे की तुम्ही जे घेतलेले छोटे छोटे स्टेप्स असतात, तेच मोठ्या यशाचे कारण असतात. त्यामुळे छोटे छोटे स्टेप घेत राहा! छोटे छोटे निर्णय घेत चला! छोटे छोटे पाऊल उचलत रहा!

यश हे निश्चित आहे! हेच छोटे प्रयत्न तुमच्या मोठ्या चांगल्या आयुष्याचे कारण बनू शकतात!

मी अशोक कांबळे (साई.ग्राफिक्स माजलगाव)
मोबाइल: 9623519938
तुमचा लहान भाऊ म्हणून समजून घ्या! माझ्या लिखाणात काही चूक किंवा भूल असेल तर समजून घ्या! आजचा हा छोटासा प्रयत्न आहे, धन्यवाद!
यशवंत व्हा! प्रयत्नवादी व्हा!

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!