6.3 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ. विजयसिंह पंडित यांनी सुरुळीत वीज पुरवठा बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या सुचना

तालखेड सर्कल मधील गावांना; विजेच्या लपंडावाचा शॉक

आ. विजयसिंह पंडित यांनी सुरुळीत वीज पुरवठा बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या सुचना.

तालखेड ( प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न जाणुन घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न गेवराई मतदारसंघाचे तरुण तडफदार आ.विजयसिंह पंडित हे करत आहेत.ता.माजलगाव व परिसरातील हारकी निमगाव, श्रृंगारवाडी, तेलगाव खुर्द, जदीद जवळा, एकदरा, पुंगणी आदी भागातील शेतकरी व नागरीकांच्या महावितरणच्या संदर्भात तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आज तालखेड येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रास भेट दिली. यावेळी महावितरणचे उपअभियंता श्री.आर.एस.गायकवाड व कनिष्ठ अभियंता श्री.आर.ए.काळे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थित होते.

तालखेड ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमतावाढ करून याठिकाणी लागणाऱ्या आवश्यक बाबींसंदर्भात यापूर्वीही अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा झालेली आहे. जुने आणि जिर्ण कंडक्टर, विज वाहक तारा व इतर साहित्य बदलून देण्याविषयी चर्चा झालेली आहे. या उपकेंद्रावर अतिरिक्त विजभार निर्माण होत असल्यामुळे इतर ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून काही गावांना विज जोडणी करण्यात येते का याविषयी चर्चा झाली.

तालखेड व परिसरातील गावामधील विज ग्राहकांना योग्य दाबाने व सुरळीत विज पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. आ. विजयसिंह पंडित यांच्या कार्य पद्धतीवर गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!