काळजाच्या जीवापाड ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी आधार मल्टिस्टेट….! ॲड सुनील सौंदरमल
31 मार्चला आर्थिक पत्रके जाहीर करण्याची आधार मल्टीस्टेटची परंपरा कायम:
माजलगाव/ (प्रतिनिधी ) नातं कुठलंही असो त्याची सुरुवात विश्वासातून होते आधार मल्टीस्टेटचा प्रथम आणि एकमेव ध्येय म्हणजे विश्वास विश्वास हा आम्ही आमच्या काळजाच्या तिजोरीत जिवापाड जपतो विश्वास सुरक्षा गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आधारणे आजपर्यंत केले आहे करत आहे व यापुढेही करत राहणारच आहे आजवर सर्व सभासदांनी आधार वर विश्वास टाकल्यामुळे आम्ही प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करीत आहोत.
शहरी ग्रामीण उपेक्षित वंचित व स्त्रिया या सर्वांनाच आदरणीय तात्काळ मदतीचा हात दिला आहे विविध लाभदायी योजना आधुनिक बँकिंग आणि संपूर्ण सुरक्षा यामुळेच आधारे मोठा पल्ला गाठला आहे आणि याच संपूर्ण श्रेय आमच्या सभासदांना व आमच्यावर विश्वास असणाऱ्या सर्वांनाच आहे 31 मार्च 2025 अखेर संस्थेचे भाग भांडवल दोन कोटी वीस लाख झाले आहे सोनिधी तीन कोटी 25 लाख ठेवी 46 कोटी गुंतवणूक 16 कोटी एकूण कर्जवाटप 31 कोटी शिडी रशो 60% एकूण संमिश्र व्यवसाय 76 कोटी रुपये आणि वर्षा अखेर निव्वळ नफा तीस लाख झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सुनिल सौंदरमल यांनी सांगितले.आधार मल्टीस्टेट ही मराठवाड्यामध्ये दीपस्तंभ सारखे कार्य करत आहे हे केवळ आमच्यावर विश्वास टाकलेल्या सर्व सभासदांमुळे शक्य झालेले आहे म्हणून मी याचं सर्व श्रेय माझ्यावर विश्वास टाकलेल्या सर्व सभासद संचालक कर्मचारी यांना देतो.