सावरगाव मध्ये मातोश्री रमाई नगरात, सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे,
गटविकास अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी आंबेडकर अनुयायीची मागणी…
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावरगाव येथील मातोश्री रमाई नगरात, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असुन सदरील निकृष्ट दर्जाचे झालेले बांधकाम पाडण्यात यावे व सुसज्ज असे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील आंबेडकर अनुयायी यांनी केली आहे. असे जर नाही झाले तर संबंधीत यंत्रणेवर मानवी अधिकार कायदा, नुसार कारवाई करण्यात यावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असे येथील नागरिकांनी आवाहन दिले आहे.
विविध शासनाच्या लोकपयोगी निधी अंतर्गत गाव तिथे सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र काही जन या निधीचा गैर वापर करून आपले आर्थिक झोळी भरण्याचे काम करत आहेत. सदरील काम हे शौचालय बांधकाम आराखडाया नुसार झाले नाही. केवळ डोलारा उभा करण्यात आला आहे. या शौचालय बांधकाम समोर मोठ मोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. बांधका मावर पुरेसे पाणी मारण्यात आले नाही, शोस खडे खोदण्यात आले नाही, पाण्याचे आउट लेट काढण्यात आले नाही, एम बी प्रमाणे काम झाले नाही, बेसमेट करण्यात आले नाही, भांडे, फरशी, खिडकी, बसवण्यात आले नाही, असे एक ना अनेक बांधकामात त्रुटी पाहवयास मिळत आहेत, पाण्याची दिशा देखील शौचालय कडे वळवण्यात आलेली आहे. यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांमधे निर्माण झाली आहे.
निकृष्ट दर्जाचे शौचालय बांधकाम करून गुत्तेदार आपली आर्थिक पोळी भाजून घेत आहे. संबंधीत गुत्तेदार यांनी बांधकाम अभियंता, ग्रामसेवक, यांच्या संगनमताने निकृष्ट शौचालय बांधण्यात आले आहे
. सदरील बेजबादार कर्मचारी, गुत्तेदार यांच्यावर *मानवी अधिकार कायदा*, नागरी सुरक्षा कायदा, गुणवता नियंत्रण कायदा, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम कायदा, भारतीय कंत्राटी कायदा, , या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालय माजलगाव येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मातोश्री रमाई नगरातील आंबेडकर अनुयायी यांच्याकडून देण्यात आला आहे.