सौ. दुर्गाबाई जाब्रस यांचे निधन
माजलगाव, दि. 15( प्रतिनीधी) : शहरातील झेंडा चौक भागातील रहिवासी असलेल्या सौ. दुर्गाबाई चंद्रकांतराव जाब्रस वय 75 वर्षे यांचे वृद्धापकाळाने दि. 14 शुक्रवारी पहाटे निधन झाले.सौ. दुर्गाबाई जाब्रस या अतिशय प्रेमळ व शांत स्वभावाच्या असल्याने त्या सर्व परिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सिंदफना नदी तीरावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे. एलआयसी चे विकास अधिकारी जयेश जाब्रस, पत्रकार कमलेश जाब्रस, महेश जाब्रस, निलेश जाब्रस यांच्या मातोश्री होत.