माजलगाव येथे बहुजन नायक मा.”कांशीराम यांची जयंती साजरी :
माजलगाव (वार्ताहार)आज, 15 मार्च 2025 रोजी, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आणि बहुजन नायक कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.संजय बागुल हे उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी अशोक कांबळे हे होते.या प्रसंगी प्रा.संजय बागुल यांनी बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांनी 1984 मध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश समाजातील शोषित आणि वंचित वर्गाचे हक्क राखणे होता. त्यांच्या कष्ट आणि समर्पणामुळे मायावतीसारख्या नेत्यांना चार वेळा मुख्यमंत्री पदावर पोहोचण्याची संधी मिळाली.कांशीराम यांच्या संघर्षाने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांचे योगदान भारतीय समाजात महत्त्वपूर्ण आहे.असे प्रतिपादन केले.
या वेळी बामसेफ चे रमेश जाधव , पंकजाकुमार साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदरील जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.धम्मानंद बोराडे,पत्रकार रविकांत उघडे, रमेश जाधव,लिंबाजी सोनपसरे,चर्मकार संघटनेच बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, सिद्धार्थ जाधव अशोक मगर, उद्योजक पद्माकर कांबळे,पेंटर पंकजकुमार साळवे, आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.