शासकिय गोदाम हमालांचे विविध मागण्या संदर्भात बेमुदत कामबंद आंदोलन.
माजलगाव : ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील शासकिय गोदाम हमालांची मजूरी गेली सहा महिन्यापासून पुरवठा विभागाच्या दूर्लक्षामुळे मिळत नसल्याने व इतरही अत्यावश्यक मागण्या संदर्भात दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ पासून बीड जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील हमालांनी शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायतचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायत संलग्न महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या निष्क्रिय धोरणा विरोधात व शासकिय गोदाम हमालांच्या न्यायीक मागण्या संदर्भात कामबंद आंदोलन सुरू केले आहे त्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली सहा महिन्या पासुन हमालांना मजूरी मिळाली नाही. तसेच महागाई निर्देशांकाबाबत माननीय उच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२३ रोजी आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी अद्यापही केली नाही , शासनाने आदेश देऊनही थेट वाहतूक टप्पा एक व टप्पा दोन चे काम गोदामातील हमाला कडून करून देण्याचा आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही , माथाडी मंडळाने बीड शहर गोदामातील हमालांचे काम पूर्ववत त्याच गोदामातील हमालाकडून करून घेण्याच्या पत्रा बाबत कुठलीही कारवाई केलेली नसल्याने दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असुन या आंदोलनात माजलगाव तालुक्यातील शासकीय गोदाम हमाल वैजनाथराव शिंदे ,दशरथ शिंदे , ज्योतीराम खामकर , पांडुरंग शिंदे विजय साळवे , राजभाऊ वाघमारे , लक्ष्मण होके ,गोविंद होके , देविदास होके वैभव पारवे , महादू धुमाळ आदिंनी सहभागी झाले आहेत.