मोहनराव जगताप यांनी अठरा पगड जाती, धर्माच्या लोकांत मिसळून लोकप्रितेचा गाठला उच्चांक.
लोकप्रियते मुळे मोहनराव जगताप यांची सुसाट गाडी विधानसभा कडे
माजलगाव (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोहनराव जगताप यांचा थोड्या फार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणूक लढवून लोकांच्या मनात आदराचे आणि विश्वासाचे घर मोहनराव जगताप यांनी निर्माण केले.40 वर्ष सत्तेत असणाऱ्या आ. प्रकाश दादा सोळंके यांना पाहिजे तेवढी लीड मिळवता आली नाही. मात्र पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवून आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट करून ठेवले. आणि स्वतः आत्मविश्र्वास निर्माण केला की, आगामी पंचवार्षिक विधानसभेचा सदस्य मीच असणार हे जेवढे त्यांना वाटते तेवढे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला वाटू लागले आहे.
माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप हे व्यक्तिमहत्त्व गोरगरीब, लोकांना सांभाळणारे, याच धर्तीवर मोहनराव जगताप यांनी वसा पुढे ठेवला,मतदारसंघातील लोकांच्या सुख दुःखात सहभाग नोंदवून त्यांच्या आनंदात, दुःखात सामील होऊन कुटुंबातील सदस्य सारखी वागणूक निर्माण केली. यामुळे सर्व जाती धर्मातील अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना मोहनराव जगताप हे आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याची जाणीव निर्माण केली. यामुळे मोहनराव जगताप यांची लोकप्रियता दिवसा नि दिवस वाढत आहे
.
मोहनराव जगताप यांचा मतदानानी पराभव झाला असला तरी ही लोकांच्या मनात मोहनराव जगताप हे विजयी झाले आहेत. पहिल्याच निवडणुकीत मोहनराव जगताप यांनी जोरदार एन्ट्री मारल्यामुळे लोका मध्ये मोहनराव जगताप यांची क्रेझ वाढली आहे.
दिलेले वचन पाळणे, दिलेल्या शब्दाला जागने ही मोहनराव जगताप यांची सचोटी असल्यामुळे लोकांच्या मनात मोहनराव जगताप यांनी घर केले आहे. कटू सत्य उराशी बाळगून जनतेच्या सेवेत राहत गेल्यामुळे लोकांनी कधी त्यांना दुरावा जाणुदिला नाही. याचे फलित विधानसभे मध्ये दिसून आले.
सत्तेत असू या नसून जनसेवे मध्ये सदैव कार्यरत राहिल्यामुळे जनता त्यांना चिटकून राहिली. हीच जनतेची विश्वास हर्ता मोहनराव जगताप यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पहोचणार यात तिळ मात्र शंका नाही. या जनतेच्या प्रेमा पोटी व जनतेच्या आशीर्वादामुळे मोहनराव जगताप यांची गाडी विधानसभेच्या वाटेने सुसाट सुटली आहे. यश निश्चित मिळेल यात मात्र शंका नसल्याचे जनतेच्या गोठ्यातून बोललेले जात आहे.