अतुट खातेदार जोडण्यासाठी मल्टिस्टेट, अर्बन, पतसंस्था, वित्तीय संस्था कडून आर्थिक साक्षरता मोहिमेची गरज.
माजलगाव ( प्रतिनिधी) सर्व महाराष्ट्र भर मल्टिस्टेट, अर्बन पतसंस्था, निधी, या वित्तीय संस्था कार्यरत आहेत. या वित्तीय संस्थे मार्फत गरजू लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. व सधन व्यक्ती कडून ठेवी स्वीकारल्या जातात. यामुळे स्थानिक परिसरात छोटे मोठे उद्योग निर्माण होऊन आर्थिक भरभराटी होते. मात्र अनेक कर्जदार यांना कर्ज कशा करीता दिले, व घेतलेल्या कर्जाचा उपयोग कशा करीता करायचा याचे महत्व न समजल्यामुळे तो आर्थिक खाईत सापडतो, व हतबल होऊन तो वित्तीय संस्थेवर खापर फोडतो. यामुळे कर्जदाराने कर्जाच्या रकमेचे आर्थिक नियोजन केले का? केले नसेल तर त्या कर्जदाराला आर्थिक नियोजनाचे धडे देणे आवश्यक आहे. यासाठी आर्थिक साक्षरता मोहीम वित्तीय संस्थेकडून राबवणे गरजेचे झाले आहे. यामुळे अतुट खातेदार जोडला जाऊ शकतो व संस्थेची बदनामी रोखली जाऊ शकते.
प्रत्येक वित्तीय संस्था ह्या विश्वास आणि propt सर्व्हिस वर टिकून असतात. ग्राहकांचा विश्वास उडाला की, संस्था देखील उडू लागतात. आणि डावातील पत्त्या सारख्या कोसळू लागतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास जपणे आणि टिकवून ठेवण्यासाठी संस्था सर्व बाजूनी सक्षम ठेवली पाहिजे. या करिता ग्राहकांना वित्तीय साक्षरतेची सध्या तरी गरज निर्माण झाली आहे. कर्मचारी यांच्या मीटिंग बरोबर कर्जदारांच्या मीटिंग देखील घेतल्या जावेत, यातून कर्जदार संस्थेच्या प्रवाहात राहून, वित्तीय संस्थेच्या अतूट बंधनात राहिला पाहिजे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
अनेक मल्टिस्टेट, अर्बन, पतसंस्था, ह्या उत्तम काम करतात. मात्र एखाद्या डबगाईलेल्या कर्जदारा कडून वित्तीय संस्थेची बदनामी केली जाते. दोषी ठरवले जाते. यातून सुरुळीत व्यवहारात अडथळा निर्माण होऊन इतर खातेदारामध्ये अविश्वास निर्माण होण्यास वाव मिळतो. हे टाळण्यासाठी वित्तीय संस्थानी आर्थिक साक्षरतेचे धडे देणे गरजेचे बनले आहे.
सध्या अनेक वित्तीय संस्थांचे दिवाळे वाजल्यानी अनेक चागल्या काम करणाऱ्या संस्थाना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचा परिणाम भोगावा लागतो. हे भविष्यात आपल्या संस्थे सोबत होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता निष्काळजी पणा दिसून येतो.
अनेक ठेवीदार वाजवी व्याजाच्या लालशी पायी ठेवी ठेवल्या जातात. मात्र संबंधीत वित्तीय संस्थेची पूर्ण कार्य प्रणाली समजून न घेता अंध होऊन ठेवी ठेवल्या जातात. याचा फटका काही काळा नंतर बसला जातो. भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ खातेदारावर येऊ नये, याकरिता खातेदारांनी वित्तीय संस्थेच्या कार्य प्रणाली वर लक्ष ठेवले पाहिजे. व आपल्या ठेवी भविष्यात सुरक्षित कशा राहतील याकडे बारकाईनी लक्ष ठेवले पाहिजे. तरच ठेवीदार निश्चित राहू शकतो. आणि भविष्यात आर्थिक संकटापासून वाचू शकतो. हे तितके खरे होय.