चाटे स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विद्यार्थी कलाकारांच्या सादरीरणावर प्रेक्षकांनी धरला ठेका
केज दि १२(प्रतिनिधी) शहरातील समर्थनगर भागातील चाटे स्कुल मध्ये मंगळवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
कार्यक्रमास जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, डॉ नितीन चाटे,शिवाजी ठोंबरे,दिनकर चाटे,भगवान चाटे,रामधन चाटे ,अजय चाटे , राजेभाऊ चाटे , अंनिस चे हनुमंत भोसले, दुर्गादास लांब, डॉ हनुमंत सौदागर, श्रीराम तांदळे,अनिल गलांडे,अर्शद शेख,मुबशीर शेख, दिनकर चाटे, संस्थेचे सचिव शिवाजी चाटे आदींची उपस्थिती होती .
चाटे इंग्लिश स्कूल येथील चौथ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी,विविध गीतांवर ठेका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडिया च्या अतिवापराचे दुष्परिणाम, अंधश्रद्धा निर्मूलन , पर्यावरण , देशभक्ती आदी विषयावर नाट्य,गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्तविक शिवाजी चाटे यांनी केले हनुमंत भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, संगीत या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांची आवड कशात आहे हे पालकांनी व शिक्षकांनी ओळखून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहन द्यावे मला खात्री आहे की चाटे स्कुल च्या रोपातून वटवृक्ष उभा राहत आहे.विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळ खेळावेत असे मत व्यक्त केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमास पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.