छ.संभाजी नगर येथे पर्यावरण व बाल हक्क परिषदेचे आयोजन.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थांनी उपस्थित रहावे: रमेश कुटे
बीड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्य करत असताना विविध अडचणीला संस्थांना सामना करावा लागतो, त्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी छ. संभाजीनगर येथे पर्यावरण व बाल हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेला संस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरस्वती सेवाभावी संस्था भाटवडगाव,चे अध्यक्ष रमेश कुटे यांनी केलेलें आहे. या परिषदेचे आयोजन सरस्वती सेवाभावी संस्थेसह लोक प्रबोधन विविध कला गुणदर्शन कलामंच,तुळजापूर, उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद, ज्ञानशक्ती विकास वाहिनी मंचर ता. आंबेगाव पुणे, सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ, कृषी समृद्धी मल्टीपर्पज- बुलढाणा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. पर्यावरण व बाल हक्क परिषद 2025 दिनांक 17/01/2025 वेळ 10 ते 1.30. रोजी डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्र -टीव्ही सेंटर रोड-जवळ -छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेले आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची नाव नोंदणी मोफत ठेवण्यात आलेली असल्याची माहिती रमेश कुटे यांनी दिली आहे. तसेच या परिषदेसाठी विशेष मार्गदर्शन करण्यास आसाम राज्य मधील मा.पपू शहा उपस्थित राहणार आहेत. ही परिषद यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर हनवते, रामदास गायकवाड, धनाजी धोतरकर, बी. के.वळसेपाटील, महेंद्र सौभाग्य हे सहकार्य करत आहेत. तरी इच्छुक सामाजिक संस्था प्रतिनिधी, व्यक्ती यांनी खालील लिंक वर नोंदणी करावी असे आव्हान करण्यात येत आहे.