शहराच्या मुख्य प्रवेशद्वारातून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करुनच पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहने सोडावावेत : पो. नि. राहुल सूर्यतळ
माजलगाव( प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य प्रवेश द्वारा वर निगराणी पथक नेमण्यात आले आहे. हे पथक शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करून प्रवेश दिला जात आहे. पो . नि.राहूल सूर्यतल यांनी संबंधित सादोला येथील पॉइंट ला भेट दिली असता, त्यांनी कर्मचारी यांना सांगितले की, गढी कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात यावी तसेच चौकशी करूनच वाहने पुढें जाऊ द्यावेत अशी सूचना उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी केल्या .
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखले केले आहेत. या निवडणुका निर्विघ्न पार पडव्यात याकरिता पोलीस यंत्रने कडून खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक चारचाकी वाहने पोलीस व निवडणुक विभागाचे कर्मचारी तपास करत आहेत. निगराणी पथकातील सर्चच कर्मचारी आपले कामे चोख पणे पार पाडत आहेत