सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा सुमितकुमार भारस्कर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशात द्वितीय
माजलगाव (प्रतिनिधी) मेरठ उत्तरप्रदेश येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा सुमितकुमार लक्ष्मण भारस्कर हा विद्यार्थी देशात द्वितीय आला असून, रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.सुमितकुमार ने महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिले आहे गेली अनेक वर्ष सुमितकुमार सातत्याने कुस्तीचा सराव करत आहे. त्याने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहेया खेळाडुला क्रीडा शिक्षक प्रा.प्रविण कोरडे . प्रा नवनाथ आवारे प्रा. सुखदेव माने. प्रा डॉ. सी. डी. फड यांचे मार्गदर्शन लाभले.सुमितकुमारच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. जी. के. सानप, उपप्राचार्य डॉ. एन. के. मुळे, उपप्राचार्य डॉ. एम. ए कव्हळे, प्रा. प्रकाश गवते, प्रा. पवनकुमार शिंदे, पर्यवेक्षक प्रा. अलझेंडे सर, प्रा. टाक ,प्रबंधक प्रशांत चव्हाण, अधीक्षक सतीश एरंडे, प्रा.सुदर्शन स्वामी,एकनाथ मस्के यांनी अभिनंदन केले.