माजलगाव मतदार संघातील स्ट्राँग ओ.बी.सी चेहरा,माधव (तात्या) निर्मळ यांचा पक्षाकडे सुपूर्द केला राजीनामा.
माजलगाव ( प्रतिनिधी) धारूर येथील उद्योजक माधव तात्या निर्मळ यांचे वडील कै.अंबादासराव निर्मळ राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे काम करत होते. पुढें मुलगा माधव तात्या निर्मळ यांनी देखील काम सुरू ठेवले. मात्र वेळोवेळी उमेदवारीची मागणी करून देखील उमेदवारी दिली जात नव्हती. या बाबी ला कंटाळून आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित दादा पवार गट) प्राथमिक सद्स्य जिल्हा कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला. यामुळें तगडा ओ बि सी चेहरा असलेला उमेदवार पक्षातून बाहेर पडल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटा च्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.