भावसार समाजाच्या वतीने सिद्धेश्वर हजारे, पूर्वा लांडे यांचा सत्कार सोहळा संपन्न.
माजलगाव :- (प्रतिनिधी ) येथील भावसार समाजाचे सिध्देश्वर हजारे यांची बीड जिल्हा कृषी अधिकारी पदी नियुक्ती झाली असून भावसार समाजाच्या पूर्वा रामेश्वर लांडे हिने वैद्यकीय पूर्व परीक्षा नीट प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये यश मिळवत MBBS मेडिकल कॉलेज परभणी येथे प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे भावसार समाजाच्या वतीने दि.२२ ऑक्टोबर रोजी भावसार सभागृह येथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी साठी भावसार समाजाचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांनगावकर प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी महेश सदरे,विक्रम गार्डी व माजलगाव समाज अध्यक्ष प्रदीप भावसार,चंद्रकांत बुलबुले,दत्ता गर्जे, सतीश गरुड, रामेश्वर लांडे,डिगांबर गरुड,श्रीराम कळसकर , दत्तात्रय गरुड,राजेश भावसार, रामेश्र्वर कुटे, संतोष लोखंडे,गजानन खोले,सदाशिव कळसकर, सखाराम पतंगे. यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावसार यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार निलेश गरुड यांनी मानले या वेळी मोठ्या संख्येने महिला मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.