निराधारांनाची दिवाळी होणारं गोड; 10 कोटी 57 लक्ष अनुदान बँक खात्यात वर्ग
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान बँक कडे वर्ग.
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व योजनेचे अनुदान 10 कोटी सत्तावन लाख पन्नास हजार रूपये बँकेच्या खात्यात वर्ग कऱण्यात आले आहे. हे अनुदान तालुक्यातील 23हजार पाचशे लाभार्थ्यांना मिळणारं असून दिवाळी सणा मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग कऱण्यात येत आहे यामुळें यंदा निराधारांची दिवाळी गोड होणारं आहे यामुळें लाभार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
सरकार कडून निराधारांना आधार म्हणून आर्थिक अनुदान दिले जाते. हे अनुदान जुलै ते सप्टेंबर महिन्याचे 10 कोटी 57लाख 50 हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग कऱण्यात येत आहे. सदरील अनुदान तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3 शाखा, तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 5 शाखा, एस बी आय, 3शाखा, HDFC 1, पोस्ट बँक 4असा सर्व शाखा अन्तर्गत अनुदान वर्ग कऱण्यात आले असून लाभार्थ्यांना दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात अनुदान वर्ग कऱण्यात येत आहे.
लाभार्थ्यांनी तीन महिन्याचे अनुदान आपल्या खात्यावरून
काढून घेण्यात यावे असे माजलगाव येथील तहसिलदार श्री संतोष रुईकर यांनी आवाहन केलें आहे.