कन्या शाळेची अक्षरा पवार हिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
माजलगाव(प्रतिनिधी):जि.प.माध्यमिक कन्या शाळा माजलगावची विद्यार्थीनी अक्षरा बाबासाहेब पवार हिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जि.प.माध्यमिक कन्या शाळा माजलगाव येथील व्हॉलीबॉलचा संघ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.या स्पर्धेत अक्षरा बाबासाहेब पवार हिची उत्कृष्ट कामगिरी बजावली,तीच्या चमकदार कामगिरीमुळे निवडकर्ते, प्रेक्षक व पालकांची मने जिंकली,तीच्या या चमकदार कामगिरीमुळे तीची 10 ते 14 ऑक्टोंबर रोजी वाराणसी(उत्तर प्रदेश)येथे होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिला व्हॉलीबॉल चे प्रशिक्षण राज सोनपसारे यांच्या कडून मिळाले,त्यांनी 365 दिवस शाळेत सराव चालु ठेवला,त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.
अक्षरा बाबासाहेब पवार व राज सोनपसारे यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
या निवडी बद्दल गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी,तालुका क्रिडा संयोजक सचिन मोती,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फरहाना मुनवरखॉं पठाण,शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गरबडे, बाळासाहेब सोनसळे,दिनकर वाघमारे,शरद नायबळ,चंद्रकांत यादव,विलास रेवलकर,बालासाहेब कांबळे,सुंदर काळे,मंदा सारूक,लता पारगावकर,संगीता राठोड,संगीता शिंदे,ज्योती कोगीडरकर,जयश्री लोणीकर,हिरा मगर,नारायण भालशंकर,हसीब सौदागर,बालासाहेब जामकर,शेख अब्दुल,गोरख उघडे,तसेच तुळजाभवानी अर्बनचे चंद्रकांत शेजुळ,शहाजी शेजुळ,रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटीचे रविंद्र कानडे,पुरूषोत्तम जाधव,शिक्षक नेते व माजलगाव शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रमेश फपाळ,माजी सरपंच रामेश्वर कोरडे, रमेशचंद्र कोडगिरकर या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.