वंचित बहुजन आघाडी धारूर तालुका आयोजित कार्यकर्ता मेळावा संपन्न. कार्यकर्ता मेळाव्यास उत्स्फूरत प्रतिसाद.
धारूर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी माजलगाव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार शेख मंजुर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा धारूर शहरातील आर्या फंक्शन हॉल येथे संपन्न झाला.
दलित -मुस्लिम-आदिवासी-ओबीसी समूहामध्ये शेख मंजुर यांच्या उमेदवारीने अतिशय उत्साहाचा वातावरण तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहे. या बैठकीत प्रास्ताविकपर तालुकाध्यक्ष इंजि. प्रशांत उघडे यांनी बोलताना पक्षाने दिलेला उमेदवार शेख मंजुर असुन ते सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांना मंजुर आहे.
. येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने शेख मंजुर यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन दिले. तसेच
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख मंजुर यानी माजलगाव मध्ये नगर परिषदेचे नगराध्यक्ष असताना विविध कल्याणकारी योजना राबवून केलेल्या विकास कामांची माहिती दिली. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने माजलगाव मतदार संघातील धारूर तालुक्यातील घाट रुंदीकरणाचा प्रश्न असेल , धारूर शहरातील पाणीपुरवठ्याची योजना असेल, प्रभावी राबवण्याचे धारूरकरांना आणि तालुक्यातील जनतेला आश्वासन दिले
.
येणाऱ्या काळामध्ये धारूर तालुक्यातील उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल ,सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांना घेऊन मी वंचित बहुजन आघाडी कडून उभा आहेः आपण जर मला संधी दिली तर नक्कीच याची पूर्तता करण्याचे आश्वासन शेख मंजूर भाई यांनी बोलताना विश्दिर्वास दिला. या बैठकीला वंचित
बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे, सचिन उजगरे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल भैय्या डोंगरे युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, माजलगाव तालुका अध्यक्ष संजय नाकलगावकर वडवणी तालुकाध्यक्ष अविनाश झोडगे समाधान गायकवाड, धम्मानंद साळवे धारूर तालुक्याचे महासचिव अभिजीत वावळ, अमोल बनसोडे बाळासाहेब उजगरे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, कपिल उजगरे, पप्पू उघडे सचिन ढोबळे व मोठ्या संख्येने धारूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभिजीत वाव्हळ यांनी केले.