प्रणिता मस्के यांना मराठी विषयात पीएच.डी.प्रदान
माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि गाईड डॉ. कमलाकर कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली “डॉ. सदानंद मोरे यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास” या विषयावर संशोधन करून शोध-प्रबंध विद्यापिठास सादर केला होता. बहिस्थ परीक्षकांच्या परीक्षणानंतर सौ. प्रणिता मस्के या संशोधक विद्यार्थीनीस पीएच. डी. बहाल करीत असल्याचे अधिकृत कळविले आहे.या यशामुळे मराठी विभागप्रमुख डॉ. अंभुरे सर, बहिस्थ परीक्षक, मार्गदर्शक कांबळे सर, डॉ. सतिष मस्के, डॉ. सोपान सुरवसे, बिभिषण नागरगोजे तसेच पीएच.डी. विभागातील अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच सौ. प्रणिताचे आई-वडील, भाऊ-बहिण, तिची मोठी बहिण प्रा. डॉ. प्रतिभा सरवदे व भाऊजी प्रा.डॉ. बापु सरवदे, प्रणिताचे पती प्रा. विकास हजारे, सासु-सासरे, दिर यांनीही अभिनंदन केले आहे.तसेच श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनीही प्रणिताचे अभिनंदन केले आहे.
: