19.6 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

नितीन नाईकनवरे हे माजलगाव मतदारसंघांतील जनतेच्या मनातील उमेदवार

   नितीन नाईकनवरे हे माजलगाव मतदारसंघांतील जनतेच्या मनातील उमेदवार,

आमदारकीचा गुलाल, लावण्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला.

वरचे संकेत मिळताच नितीन नाईकनवरे लागले कामाला.

ठरवाल ते धोरण…,बांधाल तेच तोरण.!

कार्यकर्त्यांनी घेतला बैठकीत एकमुखी निर्णय.

माजलगाव( प्रतिनिधी)  दि.14ऑगस्ट रोजी नितीन नाईकनवरे यांचा वाढदिवस साजरा झाला.यावेळी विधानसभेच्या अनुषंगाने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.

याची नोंद विविध राजकीय पक्षांनी घेतली होती.दरम्यान सोमवार दि.14 रोजी नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता बैठकीत तुम्ही ठरवाल ते धोरण आणि बांधताल ते तोरण असा एकमुखी निर्णय प्रमुख कार्यकर्तासह सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आला.यातून वरिष्ठांच्या संकेत मिळताच नितीन नाईकनवरे विधानसभेच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.माजलगाव बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी सोमवार दि.14 रोजी दुपारी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले

होते.येत्या विधान सभेत आपली उमेदवारी असावी किंवा नाही.याच्या चाचपणीसाठी या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते.तत्पूर्वी 14 ऑगस्ट रोजी नितीन नाईकनवरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.याची नोंद राजकीय पक्षांनी घेतली असल्याची माहिती आहे.त्यामुळे वरचे संकेत मिळतात नितीननाईकनवरे कामाला लागले आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता बैठकीला पंचक्रोशीतून प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थिती लावली होती.दरम्यान सर्वच उपस्थित कार्यकर्त्यांनी नितीन नाईकनवरे यांना विधानसभा लढवण्याचा आग्रह केला.दादा, तुमचे काम सर्व व्यापक आहे.सर्व जाती धर्मात आपल्याला मानणारा वर्ग आहे.समाज उपयोगी अनेक काम आपण मार्गी लावली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेत नेतृत्व करण्याची आपली धमक आहे. आपण कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घ्या.आम्ही तुमच्या सोबत आहोत.आपण बांधाल ते धोरण आणि घेताल तो निर्णय आमच्यासाठी मान्य असेल.असा एकमुखी निर्णय यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी घेतला आहे.यावेळी अनेक गावच्या सरपंचासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या माध्यमातून नितीन नाईकनवरे वरचे संकेत मिळताच कामाला लागले असल्याचे दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!