माली पारगावचे सरपंच अजय शिंदेसह अनेकांचा आ. सोळंके, जयसिंग सोळंके यांचेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
तालुक्यातीलम मांली पारगाव कॅम्प येथे प्रवेश कार्यक्रम
माजलगाव(प्रतिनिधी): तालुक्यातील मालीपारगाव येथील भाजपाचे सरपंच अजय शिंदे यांचेसह अनेक युवकांनी माजलगाव मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके व जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माली पारगाव कॅम्प येथे शुक्रवार रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला.
यावेळी आ. सोळंके यांनी अजय शिंदे यांचेसह युवकांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अच्युतराव लाटे, बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, शिवाजी सोजे, राजेश मेंडके, बबन खंडागळे, पाराजी आगे, नारायण बादाडे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. सरपंच अजय शिंदे यांची परिसरामध्ये चांगली ओळख असून ओबीसी समाजामध्ये त्यांनी कार्यकर्तृत्वावर एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत परिसरातून जयसिंग सोळंके यांचा पाठीशी मोठे मताधिक्य उभे करू असे सरपंच अजय शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. दरम्यान यावेळी बोलताना जयसिंग सोळंके म्हणाले की, कोणत्याही कार्यकर्त्याने राजकीय दबावाला बळी पडू नये. कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी छातीचा कोट करू असे सांगीतले. यावेळी हरिभाऊ शिंदे, अशोक कटारे(मा,सरपंच वाघोरा).बंडू चव्हाण(ग्रा,सदस्य) जनार्धन खंडागळे( ग्रा,सदस्य) मोहन गोरे. सोपान गोरे, रफिक शेख, असिफ कुरेशी यांचेसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
दरम्यान अजय शिंदे यांच्या प्रवेशाने ओबीसी समाज जयसिंग सोळंके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील